अर्थसंकल्प २०१८
काल अरुण जेटलींनी अर्थसंकल्प सादर केला. २०१९ च्या निवडणुकांपूर्वीचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प. हा अर्थसंकल्प जेटलींसाठी खरी कसोटी होती. कारण एकीकडे नरम अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही ठोस पावले उचलणं आवश्यक होतं तर दुसरीकडे पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना आकर्षित करेल असा अर्थसंकल्प मांडायचा होता. कुठलाही अर्थसंकल्प हा परिपूर्ण असू शकत नाही. तरीदेखील ह्या अर्थसंकल्पाने दोन्ही आघाड्यांवर बऱ्यापैकी यश मिळवले आहे. मोदींच्या सरकारची खासियत कुठली असेल तर त्यांच्या प्रत्येक निर्णयावर मोदींची छाप असते. हा अर्थसंकल्प देखील ह्याला अपवाद नव्हता. अगदी 3 इडियट्स मधल्या "बोल वो रहे है लेकीन शब्द हमारे है" ह्या संवादाइतकी!!!! जेटलींनी हिंदीत बोलायला लावण्याचा प्रयोग मात्र सपशेल अपयशी ठरला. हास्यास्पद वाटेल इतकं केविलवाणं हिंदी जेटली बोलले. भाजपाकडे उत्कृष्ट हिंदी वक्त्यांची कमतरता नाही. जेटली उत्तम वक्ते असले तरी ते उत्तम हिंदी वक्ते निश्चितच नाहीत. तरीही केवळ निवडणुकांसाठी त्यांच्याकडून हिंदी वदवून घेणं हे जनतेला कळल्यावाचून राहणार नाही. धक्कातंत्र हे मोदींचं प्रमुख अस्त्र आ...